मेघालयात 11 व्यापाऱ्यांचे अपहरण

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

तुरा : मेघालयाच्या दक्षिण गारो जिल्ह्यातील गासुआपाराजवळ संशयित नक्षलवाद्यांनी मंगळवारी 11 व्यापाऱ्यांचे अपहरण केले. त्यापैकी आठजण त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले.

तुरा : मेघालयाच्या दक्षिण गारो जिल्ह्यातील गासुआपाराजवळ संशयित नक्षलवाद्यांनी मंगळवारी 11 व्यापाऱ्यांचे अपहरण केले. त्यापैकी आठजण त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले.

अपहरण करण्यात आलेले बहुतांश व्यापारी आसामचे होते आणि व्यापाराच्या निमित्ताने ते गासुआपारा गावाकडे जात होते. त्याचवेळी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्याचे अपहरण करण्यात आले. मात्र, त्यातील आठ व्यापाऱ्यांनी त्यांच्या तावडीतून पोबारा केला.

बंदुकीचा धाक दाखवून अज्ञात उग्रवाद्यांनी तीन व्यापऱ्यांना घेऊन आले असून त्यांची ओळख पटली आहे. तमल दे (वय 38), दुलान महंता (वय 36) आणि दुर्गापाडा दत्ता (वय 35) अशी अपहरण व्यापाऱ्यांची नावे आहेत.