सुरतमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार; शरीरावर 86 जखमा

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

सूरतमधील भेस्तान भागातील एका मैदानात सहा एप्रिल रोजी अकरा वर्षांच्या बालिकेचा मृतदेह पोलिस कर्मचाऱ्याला आढळून आला. या बालिकेची अद्याप ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. 

सूरत : कथुआ आणि उन्नाव येथील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच सूरतमध्ये एका 11 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या शरीरावर 86 गंभीर जखमा असल्याचे 'एएनआय'च्या वृत्तात म्हटले आहे. 

सूरतमधील भेस्तान भागातील एका मैदानात सहा एप्रिल रोजी अकरा वर्षांच्या बालिकेचा मृतदेह पोलिस कर्मचाऱ्याला आढळून आला. या बालिकेची अद्याप ओळख पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. 

"बालिकेच्या गुप्तांगासह संपूर्ण शरीरावर सुमारे 86 गंभीर जखमा आढळून आल्या. या जखमा एक ते सात दिवसांच्या कालावधीत करण्यात आल्याचे दिसून येते. या मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची शक्यता आहे,'' अशी माहिती सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी गणेश गोवेकर यांनी दिली.

Web Title: 11 year old raped murdered with 86 injuries in Surat