12 वर्षीय मुलाच्या मृत्युनंतर श्रीनगरमध्ये संचारबंदी 

वृत्तसंस्था
शनिवार, 8 ऑक्टोबर 2016

श्रीनगर: आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या पेलेट गन्सच्या गोळीबारात 12 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा हिंसाचार सुरू झाल्याने प्रशासनाने श्रीनगरमध्ये संचारबंदी लागू केली आहे. या मुलाचा मृत्यू काल (शनिवार) सायंकाळी झाला. 

श्रीनगरमधील सैदपुरा भागात काल सायंकाळी हिंसाचार सुरू झाला होता. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा दलांनी पेलेट गन्सचा वापर केला. यावेळी घराच्या बाहेरच असलेल्या जुनैद अहमद हा मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा त्या निदर्शनांमध्ये सहभागी नव्हता. जखमी जुनैदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्याला मृत घोषित करण्यात आले. 

जुनैदच्या मृत्युनंतर शेकडो नागरिकांनी पुन्हा निदर्शने सुरू केली. यात सरकारविरोधी घोषणाबाजीही झाली. यातून पुन्हा हिंसाचारास सुरवात झाली. त्यामध्ये आणखी काही जण जखमी झाले. 

दहशतवादी बुऱ्हाण वाणीला जुलैमध्ये ठार मारल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात सतत हिंसाचार सुरू आहे. यात आतापर्यंत 90 हून अधिक आंदोलक ठार झाले असून किमान 10,000 जखमी झाले आहेत. येथील शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयेही गेली अनेक दिवस बंद आहेत. 

Web Title: 12 year old boy dies; Curfew again in Srinagar