...तर हे देवा भारताला वाचव : दिग्विजयसिंह

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

उरी येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताबा मिळविलेल्या काश्‍मिरमध्ये घुसून भारताने तेथील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करावेत आणि "बुद्ध‘ आणि "युद्ध‘ नीती संयुक्तपणे वापरावी, असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केले होते.

नवी दिल्ली - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याचा सल्ला आपण दिल्याचा दावा "चूर्ण वाल्या‘बाबांनी केला आहे. जर हे खरे असेल तर हे देवा तूच भारताला वाचव‘, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केला आहे.

उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून "सर्जिकल ऑपरेशन‘करत दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेससह देशभरातून या कारवाईचे स्वागत करण्यात येत असून भारतीय लष्कराचे कौतुक करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर योगगुरू रामदेवबाबा यांचे नाव न घेता दिग्विजयसिंह यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच या कारवाईचे श्रेय घेत असल्याचेही अप्रत्यक्षपणे दाखवून दिले आहे. उरी येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताबा मिळविलेल्या काश्‍मिरमध्ये घुसून भारताने तेथील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करावेत आणि "बुद्ध‘ आणि "युद्ध‘ नीती संयुक्तपणे वापरावी, असे वक्तव्य रामदेवबाबा यांनी केले होते.

या पार्श्‍वभूमीवर रामदेवबाबा यांचे नाव न घेता "चूर्णवाले बाबा‘ म्हणत दिग्विजयसिंह यांनी त्यांना लक्ष्य केले आहे.

देश

बारा संशयितांना अटक; पाच जणांची ओळख पटली श्रीनगर: येथे जामिया मशिदीबाहेर पोलिस उपअधीक्षक महंमद अयूब पंडित यांचा माथेफिरू...

03.33 AM

नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होणार असल्याचे सूत्रांनी आज सांगितले. याच दिवशी राष्ट्रपतिपदासाठी मतदान...

01.33 AM

नवी दिल्ली: केंद्र सरकारने दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर)साठी आणखी एका आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी दिली आहे....

शनिवार, 24 जून 2017