जम्मू-काश्‍मीर राज्यामध्ये 13,700 विदेशी नागरिक

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

जम्मू : जम्मू-काश्‍मीर राज्यात 13 हजार सातशेपेक्षा अधिक विदेशी नागरिक स्थायिक झाले असून, यात तिबेटी आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. राज्यातील विदेशी नागरिकांची लोकसंख्या 2008 ते 2016 या काळात 6 हजारांनी वाढली आहे.

विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेश गुप्ता यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर लेखी उत्तरात मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील विदेशी नागरिकांची संख्या 2008 मध्ये 7 हजार 93 होती. ती 2014 मध्ये वाढून 12 हजार 560 आणि 2016 मध्ये 13,755 वर गेली आहे. यातील 5 हजार 743 हे रोहिंग्या मुस्लिम असून, तिबेटी नागरिक 7 हजार 960 आणि अन्य देशांतील नागरिक 322 आहेत, असे मुफ्ती यांनी सांगितले.

विदेशी नागरिक स्वत:च्या इच्छेने जम्मू-काश्‍मीरमध्ये आलेले आहेत. ते जम्मू-काश्‍मीरमधील सांबा जिल्ह्यात स्थायिक झाले आहेत. आतापर्यंत रोहिंग्या नागरिकांचा सहभाग दहशतवादाशी निगडित घटनांमध्ये आढळून आलेला नाही. बेकायदा सीमा ओलांडण्यासह अन्य प्रकारचे 38 गुन्हे रोहिग्या नागरिकांवर दाखल करण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: 13700 foreigners in jammu and kashmir