इन्दूर-पाटणा एक्स्प्रेसला अपघात; 90 जण ठार

वृत्तसंस्था
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

कानपूर - इन्दूरहून राजेंद्रनगरच्या (पाटणा) दिशेने जात असलेल्या एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरून घसरुन झालेल्या भीषण अपघातात 90 जण ठार झाले असून, 100 हून अधिक जण जखमी आहेत. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी साडेतीन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत देण्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

कानपूरचे पोलिस महासंचालक झाकी अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवार) पहाटे साडेतीनच्या सुमारास कानपूरजवळील पुखरायन भागात इन्दूर-राजेंद्रनगर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातात आतापर्यंत 90 जण ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना कानपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

अपघाताची माहिती मिळताच मेडिकल टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातानंतर त्या मार्गावरील काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. घसरलेले डबे हटविण्याचे काम सुरु आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव जातीने या दुर्घटनेची माहिती घेत असून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मदतीचे आदेश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.