दिल्लीत 18 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार; आरोपीला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

आरोपी अविवाहित
यातील आरोपीविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा बालिकेच्या वडिलांचा सहकारी असून, ते दोघे एका खासगी सुरक्षा कंपनीमध्ये कामाला होते, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त (दक्षिण) चिन्मय बिसवाल यांनी दिली. मात्र, त्यांनी आरोपीचे नाव उघड केले नाही.
 
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका 18 महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बालिकेच्या वडिलांच्या मित्राने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना शाहपूर जातमध्ये सोमवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे.

त्या बालिकेचे पालक कामासाठी बाहेर जात असल्याने ते त्यांच्या बालिकेचा सांभाळ करण्यासाठी आरोपीकडे सोपवत असत. तोपर्यंत ती बालिका त्यांच्याकडेच असायची. मात्र, जेव्हा बालिकेचे पालक आपली रात्रपाळी संपवून सकाळी घरी आल्यानंतर त्यांना ती दिसली नाही. त्यामुळे बालिकेची आई आणि तिचे भावंड हे तिला शोधण्यासाठी एकटेच फिरत होते. त्यांना ती सापडली नाही.

दरम्यान, जेव्हा ती बालिका संध्याकाळी घरी परतली. तेव्हा ती अत्यंत रडत होती आणि तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर तिच्या आईने तिला खासगी रुग्णालयात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. 