माध्यम उद्योगात 19 हजार कोटींची परकी गुंतवणूक

पीटीआय
सोमवार, 27 मार्च 2017

एप्रिल 2000 ते फेब्रुवारी 2015 या कालावधीत भारतीय माध्यम उद्योगात सुमारे 19 हजार 197.30 कोटींची परकी थेट गुंतवणूक (एफडीआय) झाल्याची माहिती एका पुस्तकात देण्यात आली आहे. उद्योगाचा व्याप पाहता ही गुंतवणूक 10 टक्के इतकी आहे.

नवी दिल्ली - एप्रिल 2000 ते फेब्रुवारी 2015 या कालावधीत भारतीय माध्यम उद्योगात सुमारे 19 हजार 197.30 कोटींची परकी थेट गुंतवणूक (एफडीआय) झाल्याची माहिती एका पुस्तकात देण्यात आली आहे. उद्योगाचा व्याप पाहता ही गुंतवणूक 10 टक्के इतकी आहे.

इंडियाज चेंजिंग मीडिया लॅंडस्केप या पुस्तकात भारतीय माध्यम क्षेत्रविषयक विश्‍लेषण करण्यात आले आहे. विशेषतः 25 वर्षांपूर्वी परकी गुंतवणुकीला परवानगी दिल्यानंतर माध्यम क्षेत्रावर झालेल्या बदलाचे विवेचन दिले आहे. या पुस्तकाचे लेखक अहसनुल हक चिश्‍ती असून, त्यांनी माध्यम संशोधनात डॉक्‍टरेट प्राप्त केली आहे. ते काश्‍मीरच्या बारामुल्ला येथील रहिवासी आहेत. माध्यम उद्योगाच्या वाढीचा दर दरवर्षी 14 टक्के इतका असून, येत्या 2020 पर्यंत माध्यम उद्योगाची उलाढाल 226,000 कोटींपर्यंत पोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: 19 thousand crore FDI investment in media section