2 BSF jawans killed in Naxal attack in Kanker
2 BSF jawans killed in Naxal attack in Kanker

नक्षलवादी हल्ल्यात दोन जवान हुतात्मा

रायपूर : छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात आज सकाळी नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. तसेच अन्य एक जवान जखमी झाला. सीमा सुरक्षा दलाच्या महला शिबिराजवळ चकमक झाल्याचे पोलिस उपमहानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) सुंदरराज पी यांनी सांगितले.

बीएसएफची 114 वी तुकडी नक्षलविरोधी अभियान आटोपून परतत असताना बरकोट गावात जंगलमार्गावरून जात असताना दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्या वेळी दोन्ही बाजूंनी प्रचंड गोळीबार सुरू झाला. चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले. या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले. लोकेंद्र सिंह आणि मुखथियार सिंह असे हुतात्मा जवानांची नावे आहे. ते अनुक्रमे राजस्थान आणि पंजाबचे रहिवासी होत. तसेच, संदीप डे नावाचा जवानही जखमी झाला आहे.

चकमकीची माहिती कळताच घटनास्थळी बीएसएफचे पथक पोचले. परिसरात शोध मोहीम राबवली, मात्र हाती काही सापडले नाही. यादरम्यान बीएसएफच्या तुकडीच्या मुख्यालयात जवानांचे मृतदेह आणण्यात आले तर जखमी जवानाला पुढील उपचारासाठी विमानाने रायपूरला नेण्यात आले. यापूर्वी कांकेर जिल्ह्यात छोटेबेथिया परिसरात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात गस्त घालणारे बीएसएफचे दोन जवान हुतात्मा झाले होते. हे जवान 121व्या तुकडीचे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com