कुलगाममध्ये चकमक; 3 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

कुलगामपासून 60 किमी अंतरावर असलेल्या यारीपोरा येथे ही चकमक सुरु आहे. एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर लष्करी जवान व पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील यारीपोरा येथे आज (रविवार) सकाळी लष्करी जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान हुतात्मा झाले असून, चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगामपासून 60 किमी अंतरावर असलेल्या यारीपोरा येथे ही चकमक सुरु आहे. एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर लष्करी जवान व पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात तीन जवान हुतात्मा झाले. तर, एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

या चकमकीनंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून, शोधमोहिम सुरु आहे. कुलगाममध्ये गेल्या महिन्यातही दहशतवाद्याबरोबर चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. 

Web Title: 2 terrorists killed, 2 holed up; 3 security personnel killed & 1 injured. Operation in Kulgam's Yaripora