भारतात 2050 मध्ये सर्वाधिक मुस्लिम

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

नवी दिल्ली- जगामध्ये मुस्लिम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत असून, सन 2050 मध्ये भारतात सर्वाधिक मुस्लिम असणार आहेत, असे अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली- जगामध्ये मुस्लिम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत असून, सन 2050 मध्ये भारतात सर्वाधिक मुस्लिम असणार आहेत, असे अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने अहवालात म्हटले आहे.

अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने जगभरातील लोकसंख्येवर आधारीत अहवाल तयार केला असून, तो सादर केला आहे. अहवालामध्ये म्हटले आहे की, 'जगामध्ये ख्रिश्चन धर्माच्या लोकसंख्येनंतर मुस्लिमांच्या लोकसंख्येचा क्रमांक आहे. ख्रिश्चन लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. यामुळे सन 2050 मध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असणार आहे. विशेष म्हणजे जगामध्ये सर्वाधिक मुस्लिम भारतात असणार असून, त्यांचा वयोगट 30 असणार आहे.'

जगातील लोकसंख्येच्या तुलनेट मुस्लिम धर्माची लोकसंख्या 23 टक्के एवढी आहे. टक्केवारीचा सरासरी विचार केला तर सन 2050 मध्ये 73 टक्के एवढी मुस्लिमांची संख्या होईल. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इराण व तुर्कीमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी आहे. परंतु, इंडोनेशियामध्ये सध्या सर्वाधिक मुस्लिम नागरिकांची राहात आहेत, असेही अहवालात म्हटले आहे.