मोदींमुळे मुस्लिम युवतीला मिळाले शैक्षणिक कर्ज

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

मोठ्या आशेने मी मोदींना पत्र पाठविले होते. मात्र, त्यावर एवढ्या लवकर कार्यवाही होईल, असे वाटले नव्हते. मोदींनी दहा दिवसांतच पत्राला उत्तर पाठविले आहे.

बंगळूर - गरिबीमुळे एमबीएचे शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण झालेल्या 21 वर्षीय मुस्लिम युवती सारा हिला पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शैक्षणिक कर्ज मंजूर झाले आहे.

कर्नाटकमधील मांड्या येथे राहत असलेल्या सारा हिचे वडील साखर कारखान्यात काम करतात. तिला एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज हवे होते. पण, बँकांनी तिला हप्ते भरण्यास सक्षण नसल्यामुळे कर्ज नाकारले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मदतीची मागणी केली होती. मोदींनी या मुलीची मदत केल्याने तिला शैक्षणिक कर्ज मंजूर झाले आहे.

याविषयी सारा म्हणाली, की मोठ्या आशेने मी मोदींना पत्र पाठविले होते. मात्र, त्यावर एवढ्या लवकर कार्यवाही होईल, असे वाटले नव्हते. मोदींनी दहा दिवसांतच पत्राला उत्तर पाठविले आहे. या निर्णयामुळे माझे एमबीएचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. माझे कुटुंबीयही खूप आनंदी आहेत.

Web Title: 21 year old sara got rexponce from pm for education loan