पाकिस्तानकडून 218 भारतीय मच्छिमारांची सुटका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

अहमदाबाद/कराची- पाकिस्तानने 218 भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे, अशी माहिती गुजरात मच्छिमार संघटनेचे उपाध्यक्ष वेलजीभाई मसानी यांनी आज (शुक्रवार) दिली.

मसानी यांनी सांगितले की, 'पाकिस्तानने 218 भारतीय मच्छिमारांची सुटका केली. परंतु, या मच्छिमारांची सुटका करण्यापुर्वी एका मच्छिमाराचा पाकिस्तानातील कारागृहात हृदयविकाराने मृत्यू झाला. जीवा भगवान (वय 37, रा. खान, जिल्हा सोमनाथ) असे मृत्युमुखी पडलेल्या मच्छिमाराचे नाव आहे.'

'पाकिस्तानी न्ययालयाने दिलेल्या आदेशानुसार भारतीय मच्छिमारांची आज सुटका करण्यात आली आहे. पाकिस्तानने गेल्या दहा वर्षांमध्ये 439 भारतीय मच्छिमारांची सुटका केली आहे,' अशी माहिती कराची येथील मलीर कारागृहाचे अधीक्षक हसन सहतो यांनी दिली.