24 तासांत 162 बंडखोर ठार 

In 24 hours 162 rebels killed
In 24 hours 162 rebels killed

काबूल- अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी बंडखोरांच्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली असून, मागील 24 तासांत विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 162 सशस्त्र बंडखोरांना ठार करण्यात यश आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. ठार करण्यात आलेल्या बंडखोरांमध्ये तालिबानचे सात कमांडर असल्याचेही सांगण्यात आले; तसेच कारवाईमध्ये इतर 66 बंडखोर जखमी झाले असून, एका जणाला अटक करण्यात आली आहे. बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलाचे 11 सैनिक ठार झाल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. 

मागील 24 तासांत 11 ठिकाणी संयुक्त कारवाई करण्यात आली असून, 19 ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईत बंडखोरांची ठिकाणे आणि शस्त्रसाठा लक्ष्य करण्यात आला होता, असे निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com