24 हजार भाविकांनी घेतले अमरनाथचे दर्शन

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जुलै 2016

जम्मू  : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेनिमित्त आत्तापर्यंत जवळपास 24 हजार भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे. दरम्यान, भाविकांची तिसरी तुकडी गुहेच्या दिशेने रवाना झाली असल्याची माहिती अमरनाथ देवस्थान मंडळाच्या पदाधिकाऱ्याने दिली. 

दर्शनासाठी दूरदूरवरून आलेल्या भाविकांपैकी 15 हजार भाविकांनी काल दर्शन घेतले होते. तर आज सकाळपर्यंत एकूण 23 हजार 787 जणांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी तयार असलेली तिसरी तुकडी भगवतीनगर येथून भल्या पहाटे पोलिस बंदोबस्तात गुहेच्या दिशेने मार्गस्थ झाली. या तुकडीत 1842 भाविकांचा समावेश आहे. ही तुकडी संध्याकाळपर्यंत बाल्टल आणि पहलगाम तळावर पोचणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

देश

नवी दिल्ली: विमानाचे तिकीट आरक्षित करण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करणे, असा कोणताही विचार सध्या केंद्र सरकार करत नसल्याची...

08.36 PM

मद्रास उच्च न्यायालयात केला अर्ज चेन्नई: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी...

07.51 PM

अहमदाबाद  - भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि...

05.00 PM