राजस्थानात 29 जणांना झिका विषाणूची लागण 

राजस्थानात 29 जणांना झिका विषाणूची लागण 

जयपूर (पीटीआय) : राजस्थानमध्ये 29 जणांना "झिका' या विषाणूची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. यात तीन गर्भवती महिलांचा समावेश आहे. हे सर्वजण जयपूर परिसरातील आहेत. 

याबाबत माहिती सांगताना आरोग्य खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव वीणा गुप्ता म्हणाल्या, ""झिका व्हायरस पसरू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील शास्त्रीनगर भागातील प्रत्यक घरात जाऊन पाहणी करण्यात आली आहे. सुमारे 450 जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 29 जणांची चाचणी "पॉझिटिव्ह' आली आहे. केंद्राचे सात सदस्यांचे एक उच्चस्तरीय पथक जयपूरमध्ये मदतीसाठी दाखल झाले आहे.'' 

"जयपूरमधील परिस्थितीमुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे,'' असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. विषाणूची बाधा झालेल्यांपैकी एक तरुण मूळचा बिहारचा रहिवासी आहे. तो सध्या जयपूरमध्ये शिक्षण घेत आहे. तो 28 ऑगस्ट आणि 12 सप्टेंबरदरम्यान सीवान जिल्ह्यात आपल्या घरी जाऊन आला होता. त्याच्या कुटुंबातील लोकांना या विषाणूची लागण झाली किंवा नाही याची तपासणी करण्यात येत आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाने जयपूरमधील स्थितीचा सविस्तर अहवाल राज्य सरकारकडून मागितला आहे. त्याचबरोबर परिस्थितीवर नियमित देखरेखीसाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रात (एनसीडीसी) नियंत्रण कक्ष सक्रिय करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या स्तरावर परिस्थितीचे विश्‍लेषण केले जात आहे. भारतात जानेवारी आणि फेब्रुवारी 2017 मध्ये पहिल्यांदा या विषाणूचा प्रसार होत असल्याचे अहमदाबादमध्ये आढळून आले होते. त्यानंतर तमिळनाडूतही याचे रुग्ण सापडले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com