कळंगुट समुद्रात अकोल्यातील तिघे बुडाले; दोघे बेपत्ता

अवित बगळे
सोमवार, 11 जून 2018

सध्या पावसाळ्यात समुद्रात उतरण्यास बंदी आहे. १४ पैकी ५ जण समुद्रात ओढले गेले. 
त्यापैकी ३ जण २० मिनिटांनी आढळून आले. मात्र पाण्याबाहेर काढेपर्यंत त्यांनी प्राण गमावला होता.

पणजी : उत्तर गोव्यातील जगप्रसिद्ध कळंगुट किनाऱ्यालगतच्या समुद्रात मोठी उंबरी विठ्ठलनगर अकोला येथील तिघे बुडून‌ मरण पावले. अन्य दोघेजण बेपत्ता आहेत.

कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील १४ जणांचा गट पहाटे ४ वाजता मडगाव रेल्वे स्थानकावर उतरला. तेथून टॅक्सी करून ते कळंगुटला गेले व तडक समुद्रात उतरले.

सध्या पावसाळ्यात समुद्रात उतरण्यास बंदी आहे. १४ पैकी ५ जण समुद्रात ओढले गेले. 
त्यापैकी ३ जण २० मिनिटांनी आढळून आले. मात्र पाण्याबाहेर काढेपर्यंत त्यांनी प्राण गमावला होता.

त्यात प्रीतेश गवळी (३२, पोलिस कॉन्स्टेबल), चंदन गवळी (२७, विद्यार्थी), उज्ज्वल वाकोडे (२५, मेकानिक) यांचा समावेश आहे. किरण म्हस्के व शुभम वैद्य असे दोघे बेपत्ता आहेत.

Web Title: 3 drown on kalangut beach in Goa