धुक्‍यामुळे अपघात; तीन ठार, सहा जखमी!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

अलाहाबाद : दाट धुक्‍यामुळे समोरचे दृश्‍य न दिसल्याने ट्रकच्या धडकेने झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे किमान तीन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अलाहाबाद : दाट धुक्‍यामुळे समोरचे दृश्‍य न दिसल्याने ट्रकच्या धडकेने झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे किमान तीन जण ठार तर सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

राजधानी दिल्लीसह, उत्तर प्रदेशमध्ये देशभरात अनेक ठिकाणी गुरुवारी रात्रीपासूनच दाट धुके आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्‍यताही वाढली आहे. अशातच एका ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातांमुळे तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले असून सहा जण जखमी झाले आहेत. रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीवरही धुक्‍याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
राजधानी दिल्ली, लखनौ, अमृतसरमध्ये धुके दाटले आहेत. त्यामुळे या शहरातील विमानांचे उड्डाण नियोजित वेळेपेक्षा उशिराने होण्याची शक्‍यता आहे.

'कमी दृश्‍यमानता दिल्ली विमानाळावरून होणारे विमानांचे उड्डाण आणि दिल्ली विमानतळावर उतरणाऱ्या विमानांना उशिर होण्याची शक्‍यता आहे. तसेच लखनौ आणि अमृतसर येथेही विमानांना विलंब होण्याची शक्‍यता आहे', अशी माहिती जेट एअरवेजने ट्विटरद्वारे दिली आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार राजधानी दिल्लीतून आज 49 प्रवासी विमाने उड्डाण घेणार होती. शिवाय राजधानी एक्‍सप्रेससह अन्य काही मार्गावरील रेल्वे गाड्याही धावणार आहेत. मात्र धुक्‍यामुळे या रेल्वे मार्गावरील रेल्वेना उशिर होण्याची शक्‍यता आहे.