कचऱयाच्या ढिगाऱयात मुलीचा मृतदेह आढळला

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

चेन्नई- उत्तर चेन्नईतील थिरुवोत्तीयुर येथे एका ढिगाऱयामध्ये तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.

चेन्नई- उत्तर चेन्नईतील थिरुवोत्तीयुर येथे एका ढिगाऱयामध्ये तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याची शक्यता आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (सोमवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'घराजवळून मुलगी शनिवारी (ता. 18) दुपारी दोनच्या सुमारास बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबियांनी घराजवळ शोध घेतला. परंतु, न सापडल्यामुळे रात्री आठच्या सुमारास तक्रार दाखल केली होती. तिचा शोध सुरू असतानाच एका ढिगाऱयामध्ये तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या शरिरावर विविध खुना आहेत. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केला असावा, असे प्राथमिक दर्शनी दिसत आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.