गोव्यात आपच्या 39 पैकी 38 जणांचे डिपॉझिट जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मार्च 2017

पणजी- दिल्ली विधानसभेत अभुतपूर्व यश मिळवल्यानंतर पंजाब आणि गोवा या राज्यांत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाला (आप) मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत 39 जागांवर पक्षाने उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 38 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. आम आदमी पक्षाला गोव्यात एकूण मतांपैकी फक्त सहा टक्के मते मिळाली आहेत. तर, आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार एल्वीस गोम्स यांनाही पराभव स्वीकारावा लागला.   

पंजाबमध्ये आम आदमी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असला तरी, जवळपास 25 उमेदवारांना डिपॉझिट वाचवता आले नाही. निवडणुकीपूर्वी 'आप'तर्फे पंजाबमध्ये 117 पैकी 100 जागा जिंकू असा दावा करण्यात येत होता.