खाणप्रश्‍नावर तोडगा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरच काढतील - विश्‍वजित राणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राज्यातील भाजप सरकारला एकूण चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. गेल्या चार वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्रांकडून गोव्याला मिळाला आहे. आरोग्याच्या सोईसुविधांसाठी केंद्रसरकारने साडेतीनशे कोटींचा निधी दिला असून सध्या उपलब्ध झालेल्या आणि भविष्यातही उपलब्ध होण्यास सज्ज असणाऱ्या सेवासुविधा लोकांसाठीच असणार माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. गोवा भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेला त्यांच्यासोबत भाजपचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडेही उपस्थित होते. 

गोव्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना ब्रेन स्ट्रोकचा ऍटॅक आलेला आहे. मुंबईतील कोकीलाबेन इस्पितळात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून ते लवकरच राज्यात सुखरूप परततील अशी आशाही यावेळी त्यांनी व्यक्‍त केली. 

राज्यातील खाणव्यवसाय ठप्प आहे, यामुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची प्रचिती आम्हाला आहे. राज्यात निर्माण झालेल्या खाणप्रश्‍नावरील तोडगा केवळ आणि केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरच काढू शकत खात्री आम्हाला आहे. कॉंग्रेसने आतापर्यंत केवळ टीका करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम केलेले असून आतापर्यंत त्यांनी राष्ट्रपतींना भेटणार असल्याचे केवळ जाहीर केले आहे, त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या तोडग्यासह त्यांनी राष्ट्रपतींची भेट का घेतली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

Web Title: 4 years of bjp government press conference for development work