बारामुल्लात दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर चीनचे झेंडे

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या संशयित तळांवर सोमवारी रात्री घालण्यात आलेल्या छाप्यांमध्ये चीनच्या झेंड्यासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या छापेमारीत 44 जणांना अटक करण्यात आली आहे.

लष्कराचे जवान, जम्मू काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांनी संयुक्तरित्या मोहिम राबवत ही कारवाई केली. बारामुला जिल्ह्यातील काजी हमाम, गनाई हमाम, तावीद गंज, जामीयासह अन्य ठिकाणी छापे टाकले. दहशतवाद्यांना आश्रयासाठी ही सुरक्षित ठिकाणे समजली जातात. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

सुमारे 12 तास चाललेल्या या कारवाईत सुरक्षा रक्षकांनी 700 घरांची तपासणी केली. या घरांतून चीन व पाकिस्तानचे झेंडे, पेट्रोल बॉम्ब, लष्करे तैयबा व जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांची लेटरहेड, मोबाईल आणि देशविरोधी साहित्य सापडले आहे.