'एटीएम'च्या रांगेत हाणामारी; 5 जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

मुझफ्फरनगर : एटीएमच्या समोर पैसे काढण्यासाठी लावलेल्या रांगेत दोन गटांत झालेल्या हिंसाचारात पाच जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुझफ्फरनगर : एटीएमच्या समोर पैसे काढण्यासाठी लावलेल्या रांगेत दोन गटांत झालेल्या हिंसाचारात पाच जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भोकाहेरी गावातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम समोरील रांगेत उभे राहण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. दोन्ही गटांनी परस्परांवर हल्ले केले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

या घटनेत जखमी झालेल्या चोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गटांतील युवकांकडून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. हाणामारीच्या घटनेनंतर या भागात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.