काश्मीर खोऱ्यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा

Army
Army

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात रविवारी रात्री दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. पाचही दहशतवादी लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील हंदवाडा आणि बारामुल्ला येथे रविवारी रात्री दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. बारामुल्लामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तर, एक दहशतवाद्याला जिवंत पडकण्यात यश आले आहे. 92 सीआरपीएफ बटालियन, 22 राष्ट्रीय रायफल आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

हंदवाडामध्ये तीन दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांचा खात्मा केला. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्करे तैयबाचे हे तिन्ही दहशतवादी होते. रविवारी रात्री बराच वेळ चकमक सुरु होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com