काश्मीर खोऱ्यात 6 तासांत 5 हल्ले; 13 जवान जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

दहशतवाद्यांनी  त्राल आणि अवंतीपुरा येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात दहा जवान जखमी असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात मंगळवारी रात्री सहा तासांमध्ये पाच ठिकाणी दहशतवाद्यांकडून लष्करी जवानांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात 13 जवान जखमी झाले आहेत.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी त्राल आणि अवंतीपुरा येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात दहा जवान जखमी असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यानंतर सोपोर येथील लष्कराच्या कॅम्पवर हल्ला करण्यात आला. तसेच पुलवामा येथे ग्रेनेड पेकण्यात आले. अनंतनाग येथे उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांच्या सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. यामध्ये दोन जवान जखमी झाले आहेत.

दहशतवाद्यांनी जवानांच्या चार रायफल्स पळवून नेल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सतत सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. आता दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्येही काश्मीर खोऱ्यात वाढ झाली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
VIDEO: लंडनमध्ये 27 मजली इमारतीला भीषण आग
डास, चिलटांमुळे भूकंप होत नाही - भाजपकडून प्रतिहल्ला
#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'​
दोन मिनिटांनी मोठी निष्ठा टक्‍क्‍यांनीही पुढेच​

अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये
सरकार धमक्‍यांना घाबरत नाही - चंद्रकांत पाटील​

देश

अहमदाबाद: अहमदाबाद येथील पालिकेच्या शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय मुलीवर वर्गशिक्षकानेच वर्गातच बलात्कार केल्याची घटना पुढे...

06.03 AM

श्रीनगर : "रोहिंग्या मुस्लिमांना देशातून हाकलून लावण्याची भाषा करणारे लोक भारतामध्ये राहणाऱ्या तिबेटी सरकारला देश सोडण्यास...

05.03 AM

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017