सीमेवर 50 दिवसांत 22 दहशतवादी मारले

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सांबा भागात चकमक
जम्मू : सांबा भागात आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर काल (ता. 18) रात्री उशिरा भारत आणि पाकिस्तानदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तानने सीमेवरील भारतीय ठाण्यांवर गोळीबार करत शस्त्रसंधीचा भंग केला. त्यांच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमध्ये गेल्या महिन्यापासून प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळ भारतीय जवानांनी पन्नास दहशतवाद्यांना ठार मारले असून ही 2010 नंतरची सर्वांत मोठी संख्या आहे. लष्कराने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे.

जानेवारीपासूनच्या पन्नास दिवसांत विविध ठिकाणी घुसखोरीच्या प्रयत्नांत असलेल्या 22 दहशतवाद्यांना जवानांनी ठार मारले. या पन्नास दिवसांत 26 जवानही भारताने गमावले. यापैकी वीस जवानांचा हिमस्खलनात मृत्यू झाला, तर सहा जवान दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले.

गुप्तचरांनी दिलेल्या अहवालानुसार, हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्‍या बुऱ्हाण वणीला जवानांनी मारल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यातील जवळपास शंभर युवकांनी दहशतवादाचा मार्ग अवलंबिल्याने लष्कराने कडक उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. अनेक संशयितांनाही अटक झाली आहे.

 

Web Title: 50 terrorists killed in 22 days