नीरव मोदीकडून दागिने खरेदी करणे पडले महागात

50 Wealthy Indians To Face Tax Scrutiny For Buying Nirav Modi Jewellery
50 Wealthy Indians To Face Tax Scrutiny For Buying Nirav Modi Jewellery

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारामधील मुख्य आरोपी व हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याकडून महागडे दागिने खरेदी करणाऱ्या 50 बड्या व्यक्ती प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आल्या आहेत. त्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीकडून महागडे दागिने खरेदी करण्यासाठी उत्पन्नाचा कोणता स्त्रोत दाखविला, याबाबत उत्तर द्यावे, अशा नोटिसा प्राप्तिकर विभागाने पन्नासहून अधिक जणांना पाठविल्या आहेत. अनेक बड्या व्यक्तींनी नीरव मोदीकडून महागडे दागिन्यांची खरेदी धनादेश अथवा कार्डद्वारे करून उरलेली रक्कम रोख दिल्याचे समोर आले आहे. या नोटिशीला दागिने खरेदी करणाऱ्या अनेक जणांनी उत्तर दिले आहे. यात त्यांनी रोख रक्कम दिल्याचे नाकबूल केले आहे. 

प्राप्तिकर विभागाने जमा केलेल्या माहितीशी खरेदी करणाऱ्यांनी दिलेले उत्तर पडताळून पाहण्यात येत आहे. यात अनेक प्रकरणांमध्ये ही माहिती जुळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नीरव मोदीकडून दागिने खरेदी करणाऱ्या पन्नासहून अधिक जणांच्या प्राप्तिकर विवरणपत्रांची पुन्हा छाननी करण्यात येणार आहे. ही छाननी 2014-15 पासूनच्या विवरणपत्रांची होईल, असे सूत्रांनी सांगितले. 

...तर करचुकवेगिरीचा गुन्हा 
दागिने खरेदी करणाऱ्या व्यक्तींच्या प्राप्तिकर विवरणपत्रातील गैरप्रकार समोर आल्यास त्यांच्यावर करचुकवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच, इतरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल. ही प्रकरणे प्राथमिक चौकशीच्या टप्प्यावर असून, संपूर्ण चौकशी झाल्यानंतर ही कारवाई सुरू होईल, असे सूत्रांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com