घरातील 10 जणांचा गळा चिरून स्वतः घेतली फाशी

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

लखनौ- स्वतःच्या कुटुंबातील नऊ मुलींसह एकूण 10 जणांचा खून करून एका 50 वर्षीय व्यक्तीने स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात घडली आहे. 

संबंधित कुटुंब राहत असलेल्या घरामध्ये त्यांचे गळा चिरलेले मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले. हिवाळ्यात प्रकृतीसाठी चांगले आहे असे सांगून संशयित खुनी जमालुद्दीन याने रात्रीच्या जेवणानंतर कुटुंबातील सर्वांना गुंगीचे औषध दिले. 

गुंगीच्या औषधाचा परिणाम झाल्याने सर्वजण घरासमोरील ओसरीवर झोपी गेले. त्यानंतर जमालुद्दीनने 5 ते 17 दरम्यान वय असलेल्या स्वतःच्या मुलींसह भावाच्या मुलींनाही झोपेत असताना मारून टाकले, असे पोलिसांनी सांगितले. 
त्याची दुसरी 40 वर्षीय पत्नी झहीदा आणि 20 वर्षांची मुलगी अफसार आतून कडी लावलेल्या खोलीत झोपल्या होत्या. त्यामुळे त्यांना तो काही करू शकला नाही, मात्र गुंगीच्या औषधांमुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्याचे बेरोजगार असलेले दोन लहान भाऊ शमसुद्दीन, रईस आणि रईसची पत्नी हे घरी नसल्यामुळे बचावले.