कोलकाता येथून 56 लाखाच्या बनावट नोटा जप्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मार्च 2017

येथील पोर्ट परिसरातून पोलिसांनी 56 लाख 74 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या सर्व नोटा या दोन हजाराच्या असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

कोलकाता - येथील पोर्ट परिसरातून पोलिसांनी 56 लाख 74 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या सर्व नोटा या दोन हजाराच्या असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

गुरुवारी पोर्ट परिसरातील फॅन्सी मार्केट येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत बनावट नोटा आढळून आल्या. गुरुवारी दुपारी कवितीर्थ सरणी परिसरात एका दुकानात आरोपी मोबाईल खरेदी करण्यासाठी आले. मोबाईल खरेदी करताना त्यांनी दोन हजाराची नोट दुकानदाराला दिली. दुकानदाराने ती तपासून ती बनावट असल्याचे सांगितले. त्यावर आरोपींनी दुकानदाराशी वाद घातला. त्यामुळे दुकानदाराने पोलिसांनी कळविले. परिसरात गस्तीवर असलेले पोलिसांचे एक पथक तातडीने तेथे दाखल झाले. चौकशी केली असता आरोपीकडे बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणी पोलिसांनी मनोवर मोल्ला ऊर्फ उज्जवल, अबुल कलाम आजाद उर्फ सूरज, शेख एकलश अहमद, बलाई मंडल आणि सय्यद रेहान या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे 56 लाख 74 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. या बाबत गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त विशाल गर्ग यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या बनावट नोटा फॅन्सी मार्केटमध्ये कोणाला तरी देण्यासाठी आणल्या असाव्यात, अशी शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कोलकातामध्ये बनावट नोटा सापडण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

देश

भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिक सहभागी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू)...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017