बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

हैदराबाद - जुन्या नोटांसह दोन हजार रुपयांची नवी बनावट नोट छापणाऱ्या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी छापा टाकून अटक केले असून त्यांच्याकडून 2 लाख 22 हजार 310 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

हैदराबाद - जुन्या नोटांसह दोन हजार रुपयांची नवी बनावट नोट छापणाऱ्या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी छापा टाकून अटक केले असून त्यांच्याकडून 2 लाख 22 हजार 310 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या विशेष कारवाई पथकाने शहरातील इब्राहिमपठाण परिसरातून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीतील सहा जणांना अटक केली. ही टोळी जुन्या नोटांसह दोन हजार रुपयांची बनावट नोट छापत होती. अटक केलेल्यांमध्ये जमलापूर साईनाथ, जी अंजैयाह, एस रमेश, सी सत्यनारायण, के श्रीधर गौड, ए विजय कुमार यांना अटक केली आहे. टोळीतील कल्याण आणि श्रीकांत हे दोघे जण फरार होण्यात यशस्वी झाले. ही टोळी सुरुवातीला कमी किंमतीच्या बनावट नोटा छापून त्या बाजारात यशस्वीरित्या वितरित करीत होती, अशी माहिती राचकोंडातील पोलिस आयुक्त महेश एम भागवत यांनी दिली.

"या टोळीला 500 आणि 1000 रुपयांच्या बनावट नोटा तयार करून बाजारात वितरित करण्यात यश मिळाले. त्यानंतर या टोळीने नव्याने चलनात आलेली दोन हजार रुपयांची बनावट नोट छापण्यात यश मिळविले. सध्या ते ही दोन हजारची नवी नोट बाजारात वितरित करण्याची संधी शोधत होते. आम्हाला मिळालेल्या विश्‍वसनीय माहितीवरून आम्ही कट करून रमेशच्या इब्राहिमपठाण येथील घरावर छापा टाकला. तेथून आम्ही सहा जणांना ताब्यात घेतले', अशी माहिती भागवत यांनी यावेळी सांगितले. पोलिसांनी दोन फोटो कॉपी मशिन्ससह रु. 2000, रु. 100, रु. 50, रु. 20, रु. 10 किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या.

Web Title: 6 arrested in fake currency racket