देशभरात 68 इसिसमर्थकांना अटक - गृह मंत्रालय

पीटीआय
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - देशभरात एनआयए आणि एटीएस पथकाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत इसिस या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या 68 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली.

नवी दिल्ली - देशभरात एनआयए आणि एटीएस पथकाने विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत इसिस या दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या 68 जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती आज लोकसभेत देण्यात आली.

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लिखित प्रश्‍नाला उत्तर देताना माहिती दिली. चालू वर्षात सुमारे 50 जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी 11 महाराष्ट्र, 11 तेलंगणातून, 7 कर्नाटकातून, 4 उत्तराखंडमधून, 6 जण केरळमधून, 1 दिल्ली, 2 पश्‍चिम बंगाल, 1 राजस्थान, 2 उत्तर प्रदेश, 1 मध्य प्रदेश, 1 जम्मू आणि काश्‍मीर, 1 बिहार आणि 2 तमिळनाडूत पकडल्याची माहिती अहीर यांनी दिली. तपास संस्थांनी अनेक काळ पाळत ठेवून खात्री पटल्यावरच संबंधितांवर कारवाई केल्याचे अहीर यांनी नमूद केले.

इसिससारख्या समाजविघातक विचारसरणीच्या संघटना प्रसारासाठी युवकांची भरती करण्यासाठी विविध स्थानांचा वापर करत असल्याचे अहीर यांनी सांगितले.

Web Title: 68 arrested across the country isis supporter