हिमालच प्रदेशात भूस्खलन; 7 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑगस्ट 2017

मंडी-पठाणकोट महामार्गावर शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. भूस्खलनामुळे मातीचा ढीगारा महामार्गावरून जात असलेल्या दोन बसवर कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन मदत करण्यात आली. पाच जणांना वाचविण्यात यश आले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

शिमला - हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात शनिवारी रात्री दोन बसवर झालेल्या भूस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण अद्याप बेपत्ता आहेत. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडी-पठाणकोट महामार्गावर शनिवारी रात्री ही दुर्घटना घडली. भूस्खलनामुळे मातीचा ढीगारा महामार्गावरून जात असलेल्या दोन बसवर कोसळला. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन मदत करण्यात आली. पाच जणांना वाचविण्यात यश आले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे. तर, हिमाचलचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह दुर्घटनेच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. तसेच त्यांनी जखमींना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शिमल्यापासून 220 किमी अंतरावर असलेल्या कोटरुपी येथे हे भूस्खलन झाले. महामार्गावर दोन बस थांबल्या असताना ही घटना घडली. मातीच्या ढिगाऱ्यामुळे दोन्ही बस 800 फूट दरीत कोसळल्या.