वृद्धाने केला अकरा वर्षाच्या बालिकेवर बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

हैदराबाद - एका 72 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीने 11 वर्षाच्या बालिकेवर अनेकदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

येथील वनस्थळीपुरम परिसरातील इंजापूर येथे काही महिन्यांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली. सुतारकाम करणाऱ्या कृष्णा नावाच्या वृद्ध व्यक्तीने चौथ्या वर्गात शिकणाऱ्या बालिकेवर 28 जानेवारी रोजी सर्वप्रथम बलात्कार केला. बलात्कार करण्यापूर्वी कृष्णाने बालिकेला अश्‍लिल चित्रपट दाखविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पीडित बालिकेचे पालक रोजंदारीवर काम करतात. शाळेतून आल्यावर ती घरी एकटीच असते. याचा गैरफायदा खोटी कारणे देत कृष्णा तिला आपल्या घरी बोलावत होता. त्यानंतर पीडित मुलीने पालकांकडे अनेकदा तक्रार केली. मात्र, पालकांनी तिच्यावर विश्‍वास ठेवला नाही. पुन्हा असा प्रकार घडल्याने पालकांचा तिच्यावर विश्‍वास बसला. दरम्यान पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून कृष्णाला ताब्यात घेतले आहे.