कर्नाटकमध्ये अपघातात 8 शाळकरी मुलांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

बंगळूर - कर्नाटकमधील कुंडापूर येथे आज (मंगळवार) सकाळी शाळेच्या व्हॅनला बसने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 8 मुलांचा मृत्यू झाला. तर, 11 जण जखमी झाले आहेत.

बंगळूरपासून 400 किमी अंतरावर अशलेल्या कुंडापूर येथे हा अपघात घडला आहे. शाळेच्या मुलांना घेऊन ही व्हॅन जात असताना बसने समोरुन धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, व्हॅनचे छत पूर्ण सपाट झाले आहे. धडकेत व्हॅनमधील आठ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, 11 जण जखमी आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातानंतर बस चालकाने पळ काढला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 