काँग्रेसचे 91 वर्षीय नेते तिवारींचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

नवी दिल्ली- उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त ऊर्फ एन.डी. तिवारी आणि त्यांचे चिरंजीव रोहित शेखर यांनी आज (बुधवार) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 

एन.डी. तिवारी हे उत्तर प्रदेशचे तीनवेळा, तर उत्तराखंडचे एकदा मुख्यमंत्री झाले होते. तिवारी हे 1986 ते 1987 दरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री होते. तसेच, 2007 पासून 2009 पर्यंत त्यांनी आंध्रप्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारीही सांभाळली. एका कथित 'सेक्स स्कँडल' प्रकरणामुळे त्यांना राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

तिवारी हे आता 91 वर्षांचे आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत तिवारी पिता-पुत्रांनी पक्षात प्रवेश केला. तिवारी हे त्यांचे पुत्र रोहित शेखर यांना कुमाऊँ प्रांतातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची ही मागणी भाजपने मान्य केली आहे.