'आप'कडूनच 'आप'ला नोटीस; दंड भरण्याचे आदेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

उत्तर दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची जागा अवैधरित्या हस्तगत केल्याचे दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपने या प्रकरणी 27 लाख 73 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे (आप) नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनेच आम आदमी पक्षाला नोटीस पाठवत दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कार्यालयाची जागा मोकळी करण्यासही सांगितले आहे.

उत्तर दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची जागा अवैधरित्या हस्तगत केल्याचे दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपने या प्रकरणी 27 लाख 73 हजार रुपयांचा दंड भरण्यास सांगण्यात आले आहे. लवकरात ही जागा मोकळी न केल्यास दंडाच्या रकमेत वाढ करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

एप्रिल महिन्यात बांधकाम विभागाने अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवत कार्यालय मोकळे करण्यास सांगितले होते. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनीही या आदेशावर सही केली आहे.