'आप'ला आणखी एक झटका; प्राप्तिकर विभागाची नोटीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

'आप'ला 2015 मध्ये 50-50 लाखाचे चार डीडी देणगी स्वरुपात दिले होते. या देणगी प्रकरणी प्राप्तिकर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

नवी दिल्ली - दिल्ली महापालिकेतील पराभव, कपिल मिश्रांचे अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप यानंतर आता आम आदमी पक्षाला (आप) आता आणखी एक झटका बसला असून, 2 कोटींच्या देणगीप्रकरणी प्राप्तिकर विभागाने आपला नोटीस पाठविली आहे.

आम आदमी पक्षाला 2015 मध्ये मिळालेल्या 2 कोटी रुपयांच्या देणगीचे प्रकरण पुन्हा एकदा उजेडात आले आहे. प्राप्तिकर विभागाने हा देणगी नसल्याचे म्हटले आहे. 'आप'ला मिळालेली ही देणगी नसून, पक्षाची कमाई आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून ही रक्कम 'आप'कडून वसूल करण्यात येणार आहे. 'आप'कडूनही या पैशाचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

'आप'ला 2015 मध्ये 50-50 लाखाचे चार डीडी देणगी स्वरुपात दिले होते. या देणगी प्रकरणी प्राप्तिकर विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.