फरार कॉन्स्टेबल हिज्बुलला जाऊन मिळाला

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 मे 2017

चार बंदुकांसह केले होते पलायन
सईद नावीदचे आमच्या संघटनेत स्वागत आहे, असे वक्तव्य हिज्बुलचा प्रवक्ता बुऱ्हाण उद-दीन याने केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. त्यावरून तो दहशतवादी संघटनेस जाऊन मिळाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

श्रीनगर : दोन दिवसांपूर्वी बदगम जिल्ह्यातील पोलिस ठाण्यातून चार बंदुकांसह फरारी झालेला सईद नावीद मुश्‍ताक हा हिज्बुल मुजाहिदीनला जाऊन मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

सईद 2012 मध्ये पोलिस दलात भरती झाला होता. तो चांदपोरा भागातील अन्न महामंडळाच्या (एफसीआय) एका गोडाऊनच्या सुरक्षेसाठी तैनात होता. दोन दिवसांपूर्वी त्याने तेथील सहकाऱ्यांच्या चार इन्सास बंदुकांसह पलायन केले होते. सईद नावीदचे आमच्या संघटनेत स्वागत आहे, असे वक्तव्य हिज्बुलचा प्रवक्ता बुऱ्हाण उद-दीन याने केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. त्यावरून तो दहशतवादी संघटनेस जाऊन मिळाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या वृत्तास पोलिस दलाने गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दुजोरा दिलेला आहे.

यापूर्वीही घडले असे प्रकार
पोलिस कर्मचारी दहशतवादी संघटनेस जाऊन मिळाल्याची घटना काश्‍मीरमध्ये नवीन नसून, वर्षापूर्वी शकूर अहमद हा कर्मचारी चार बंदुकांसह फरारी झाला होता. नंतर त्यास अटक झाली होती, तर 2015 मध्ये पुलवामातील नसीर अहमद पंडित याने पीडीपी नेत्याच्या निवासस्थानातून दोन एके-47 रायफलींसह पलायन केले होते. नंतर तो दहशतवादी संघटनेत सामील झाला. 2016 मध्ये झालेल्या एका चकमकीत तो मारला गेला होता.

देश

अहमदाबाद: अहमदाबाद येथील पालिकेच्या शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या आठवर्षीय मुलीवर वर्गशिक्षकानेच वर्गातच बलात्कार केल्याची घटना पुढे...

06.03 AM

श्रीनगर : "रोहिंग्या मुस्लिमांना देशातून हाकलून लावण्याची भाषा करणारे लोक भारतामध्ये राहणाऱ्या तिबेटी सरकारला देश सोडण्यास...

05.03 AM

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017