आग्रा-लखनौ महामार्गावर विद्यार्थ्यांना बसने चिरडले, सहाजण जागीच ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

विद्यार्थ्यांची बस ही डिझेल संपले असल्याने एका बाजूला थांबली होती, त्याच वेळी दुसऱ्या बसने येऊन या मुलांना चिरडले. यात सहा मुले जागेवरच मृत पावली, तर तीन मुले गंभीररित्या जखमी झाली आहेत.

कन्नोज (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कन्नोज जवळ आज (ता. 11) सकाळी एक भीषण अपघात झाला. आग्रा-लखनौ महामार्गावर शाळकरी मुलांना बसने चिरडले, त्यामुळे यात सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

विद्यार्थ्यांची बस ही डिझेल संपले असल्याने एका बाजूला थांबली होती, त्याच वेळी दुसऱ्या बसने येऊन या मुलांना चिरडले. यात सहा मुले जागेवरच मृत पावली, तर तीन मुले गंभीररित्या जखमी झाली आहेत.

ज्या बसने चिरडले, त्या बसच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिस याचा अधिक तपास करीत आहेत.  

Web Title: accident on agra lakhanau express way 6 student dies in by bus dash