'यमुना एक्स्प्रेस वे'वर 20 गाड्या धडकल्या

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

या अपघातात अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मथुरा - दिवाळीनंतर राजधानी दिल्लीसह नजीकच्या भागात पसरलेल्या दाट धुक्यामुळे दिल्ली ते आग्रा दरम्यान असलेल्या यमुना एक्स्प्रेस वेवर तब्बल 20 गाड्या एकमेकांवर धडकल्या असून, अनेकजण जखमी झाले आहेत.

दिल्लीत फटाक्यांच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात धुक्याचे साम्राज्य आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात व आसपासच्या भागात धुक्यामुळे समोरील काही अंतरावरील दिसणे अवघड झाले होते. याच कारणाने आज (गुरुवार) सकाळी यमुना एक्स्प्रेस वेवर 20 गाड्या एकमेकांवर आदळल्या. 

या अपघातात अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले असून, जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या एक्स्प्रेसवर दरवर्षी याच कारणामुळे अपघात होत असतात.

टॅग्स