दिल्ली: संग्राम विहारमध्ये मुलीवर ऍसिड हल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मार्च 2017

दक्षिण दिल्लीतील संग्राम विहार परिसरात एका अठरा वर्षांच्या मुलीवर ऍसिड फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारात पीडित मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील संग्राम विहार परिसरात एका अठरा वर्षांच्या मुलीवर ऍसिड फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारात पीडित मुलगी जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज (बुधवार) सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी दिल्ली पोलिसांनी या हल्ल्याबाबत दूरध्वनीद्वारे माहिती मिळाली. पीडित मुलगी तिच्या घराबाहेर उभी असताना तिच्यावर संग्राम विहारमध्येच राहणाऱ्या रवी (वय 23) नावाच्या तरुणाने ऍसिड हल्ला झाला. त्यानंतर पीडित मुलीला उपचारासाठी एआयआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. "संग्राम विहार पोलिस स्थानकात रवी शरण आला आहे', अशी माहिती पोलिस उपायुक्‍त रोमिल बनिया यांनी दिली. पीडित मुलगी आणि रवीचे प्रेमप्रकरण होते. मात्र तिचे लग्न ठरल्याने गेल्या काही दिवसांपासून ती रवीला टाळत होती. "दुसऱ्या मुलाबरोबर बोलत असल्याचा संशय आल्याने रवीने तिच्यावर ऍसिड हल्ला केला', अशी माहिती बनिया यांनी दिली.