भाजपमधील असुरक्षिततेमुळे अभिनेत्रीचा पक्षाला रामराम

Actress Mallika Rajput
Actress Mallika Rajput

नवी दिल्ली: उन्नाव व कथुआमधील सामूहिक बलात्कारासारख्या घटना पाहता, एक महिला म्हणून मी भारतीय जनता पक्षात सुरक्षित नाही, असे कारण देत अभिनेत्री मल्लिका राजपूतने पक्षाला रामराम ठोकला आहे.

अभिनेत्री मल्लिका राजपूत उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरची रहिवासी आहे. भाजपचे राज्यसभा खासदार ओम माथूर यांच्यासह ती भाजप यूथ विंग महाराष्ट्रसाठी काम करत होती. अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत 'रिव्हॉल्वर' या चित्रपटामध्ये ती झळकली होती.

मल्लिकाने सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, राजकीय पोळी भाजण्यासाठी जो पक्ष (भाजप) हिंदू-मुस्लिम दंगली भडकवू शकतो, तो पक्ष महिलांचाही प्रयोग म्हणून वापर करु शकेल. उन्नाव बलात्कार प्रकरणामध्ये भाजप आमदार कुलदिपसिंग सेंगार यांचे नाव आहे. पक्ष एका बलात्कार करणाऱयाला पाठीशी घालत आहे. उन्नाव व कथुआमधील सामूहिक बलात्कारासारख्या घटना पाहता एक महिला म्हणून मी भारतीय जनता पक्षात सुरक्षित नाही. यामुळेच पक्षातून बाहेर पडत आहे.

दरम्यान, मल्लिका राजपूत ही नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रिव्हॉल्वर' या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत झळकली होती. शिवाय, गायक शानसोबत 'यारा तुझे नाम से’ हा अल्बमही काढला आहे. जावेद अलीसाठी 2013 मध्ये सव्वा तासाचं गाणं ‘तेरी आखिर’ लिहिले होते. त्यासाठी तिचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. मल्लिकाने 6 हजारपेक्षा जास्त गझल लिहिल्या आहेत. मल्लिका 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता रवी किशनसाठी काँग्रेसचा प्रचारार्थ उतरली होती. मात्र, प्रामाणिक पक्षाची गरज आहे म्हणत तिने भाजपमध्ये प्रवेश केला होता. मल्लिकाने 26 ऑगस्ट 2016 रोजी भाजपचं सदस्यत्व स्वीकारले होते. मात्र, आता तिने महिला सुरक्षिततेच्या कारणावरून भाजपला रामराम ठोकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com