योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रिपदाची लायकी नाही : काँग्रेस नेते गुंडू

वृत्तसंस्था
रविवार, 15 एप्रिल 2018

''योगी आदित्यनाथ हे भारतीय राजकारणाला कलंक आहेत. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याची त्यांची लायकी नाही. जर त्यांच्यामध्ये थोडीतरी लाज असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा''.

- दिनेश गुंडू राव, अध्यक्ष, कर्नाटक काँग्रेस

लखनौ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''योगी आदित्यनाथ हे भारतीय राजकारणाला कलंक आहेत. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी बसण्याची त्यांची लायकी नाही. जर त्यांच्यामध्ये थोडीतरी लाज असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा'', अशी टीका राव यांनी केली. 

उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यावर गुंडू राव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, योगी आदित्यनाथ या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. योगींचा इतिहास हा गुन्हेगारी स्वरुपाचा आहे. त्यांच्यासारख्या अनेक योगी आणि कथित संतांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. मुख्यमंत्री योगींसोबत कर्नाटक आणि भारतातील संतांचा भाजप अपमान करत आहे. उन्नाव प्रकरणात भाजप आमदारावर बलात्काराचा आरोप आहे. मात्र, अद्याप त्यांच्यावर एफआयआर दाखल झालेली नाही.

Web Title: Adityanath Is not liable for Chief Minister Post says Congress Leader Dinesh Gundu Rao