प्रशांत किशोर यांच्यावर गुजरातची जबाबदारी

महेश शहा
बुधवार, 22 मार्च 2017

उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यात अपयश आल्यानंतरही गुजरातमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्याची जबाबदारी काँग्रेसने पुन्हा प्रशांत किशोर यांच्यावर दिली आहे

अहमदाबाद - उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यात अपयश आल्यानंतरही गुजरातमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरविण्याची जबाबदारी काँग्रेसने पुन्हा प्रशांत किशोर यांच्यावर दिली आहे. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासाठी काम केले होते.

उत्तर प्रदेश आणि गोव्यात काँग्रेसला उर्जितावस्था आणण्यात किशोर यांना अपयश आले; मात्र पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता मिळविता आली. प्रशांत किशोर हे गुजरात काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्‍यता असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांचीही त्याला मान्यता आहे. शंकरसिंह वाघेला यांनी आपल्या फेसबुक आणि ट्‌विटरवर म्हटले आहे, की गेल्या 22 वर्षांपासून भाजपचे गुजरातमध्ये सरकार आहे. त्यांनी राज्याला बरबाद केले आहे. या भ्रष्टाचारी सरकारपासून मुक्तता मिळविण्याचे मन नागरिकांनी बनविले आहे. प्रशांत किशोर यांच्या प्रभावी नीतीमुळेच बिहार आणि पंजाबमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली आहे.