गुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी

महेश शहा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

राज्य सरकारकडून अधिसूचना जारी

अहमदाबाद: देशभरातील तरुणाईसाठी "डेथ गेम' ठरत असलेल्या "ब्लू व्हेल'वर गुजरात सरकारने बंदी घातली आहे. राज्य सरकारकडून तशी अधिसूचनाही जारी करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सांगितले. येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारच्या या अधिसूचनेनंतर स्थानिक प्रशासन कामाला लागले आहे.

"ब्लू व्हेल'व्यतिरिक्त सोशल मीडियामध्ये पसरलेल्या अन्य धोकादायक व्हिडीओ गेमच्या लिंक्‍स शोधण्याचे कामही आमची यंत्रणा करणार असल्याचे गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी सांगितले. सध्या राज्य सरकार तांत्रिक आणि कायदेशीर अशा दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करते आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांना आळा घालण्यासाठी आम्ही नव्या कायद्याच्या निर्मितीवर विचार करत आहे, असेही जडेजा यांनी नमूद केले.

यंत्रणा लागली कामाला
"ब्लू व्हेल'वरील बंदीच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने चार बड्या शहरांचे पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. "ब्लू व्हेल'प्रमाणेच अन्य धोकादायक खेळांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहे. दरम्यान केंद्र सरकारने याआधीच सेवाप्रदाते आणि सर्च इंजिन्सना "ब्लू व्हेल'वर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. मध्यंतरी उत्तर गुजरातेत पालनपूरमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर पुन्हा एकदा "ब्लू व्हेल' चर्चेत आला होता.