गुजरातचा गुगलसोबत करार; "डिजिटल इंडिया'साठी पुढाकार

महेश शहा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

अहमदाबाद: "डिजिटल इंडिया' मिशनअंतर्गत सुरू असलेल्या डिजिटल गुजरात चळवळीला अधिक वेग देण्यासाठी गुजरात सरकारने गुगल इंडियासोबत सामंजस्य करार केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, मुख्य सचिव जे. एन. सिंह आणि गुगल इंडियाचे जनधोरण विभागाचे संचालक चेतन कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीमध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आले.

या करारानंतर गुगल आता लघू आणि मध्यम नवउद्योजकांना प्रशिक्षण देणार असून उद्योगवाढीसाठी "डिजिटल प्लॅटफॉर्म'चा वापर कसा करावा याचा गुरूमंत्रही उद्योजकांना दिला जाणार आहे. "डिजिटल अनलॉक्‍ड' या कार्यक्रमान्वये 20 हजार डॉलरपर्यंत "क्‍लाउड'ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आधुनिक मोबाईल आणि वेब तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आवश्‍यक असणारी कौशल्ये गुगलच्या तज्ज्ञांकडून उद्योजकांना शिकविली जाणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि महिलांना रोजच्या व्यवहारामध्ये इंटरनेटचा वापर कशा पद्धतीने करायचा याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. गुजरातचा सांस्कृतिक वारसाही या डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संकलित केला जाणार असून जागतिक ज्ञानाचे संकलन या माध्यमातून केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.