गुजरातवर चालतो दिल्लीचा 'रिमोट कंट्रोल': राहुल गांधी

महेश शहा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

अहमदाबाद: गुजरातमध्ये आज कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या "रोड शो'ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पाटीदार समाजाने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ध्रोल येथील त्यांच्या सभेत "जय सरदार, जय पाटीदार' अशा घोषणा देण्यात आल्या. या सभेत मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, ""दिल्लीतून रिमोट कंट्रोलने गुजरात चालविले जाते. मोदी सरकार "मेक इन इंडिया' मोहीम राबवत आहे; पण भारतात विकल्या जाणाऱ्या अनेक वस्तू चिनी बनावटीच्या आहेत. इतकेच काय सरदार पटेलांचा उंच पुतळाही चीनमधीलच कंपनी बनवत आहे.''

राहुल गांधी यांनी आज जामनगर जिल्ह्यात मोठा "रोड शो' केला. त्यांच्या "रोड शो'दरम्यानही अशा घोषणा देण्यात आल्या. खास पाटीदार टोपी घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. पाटीदार समाजाच्या स्वागताने राहुल गांधी भारावून गेले. ध्रोल येथील सभेत पाटीदार समाजाचे नेते व लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी पाटीदार समाजाला प्रतिसाद देताना ते म्हणाले, ""अहमदाबाद येथील समाजाच्या आंदोलनावेळी पोलिसांनी गोळीबार केला. अत्याचार केला. कॉंग्रेसच पाटीदार समाजाला न्याय मिळवून देईल. भाजपचे सरकार जात व धर्माच्या आधारे विभागणी करत आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेस सत्तेवर आल्यास आम्ही सर्वांचा विकास करू.''

जामनगर जिल्ह्यातील मोठ्या "रोड शो'दरम्यान त्यांनी ठिकठिकाणी शेतकरी, ग्रामस्थ, लहान दुकानदार, तरुण अशा समाजातील सर्व घटकांशी खाटला परिषद घेत चर्चा केली. तसेच चहा घेतला. राजकोट जिल्ह्यातही त्यांचे पाटीदारांनी मोठे स्वागत केले.

आजच्या "रोड शो'च्या प्रतिसादावरून येत्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार समाज कॉंग्रेसच्या पाठीशी उभा राहील, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.