काँग्रेसच्या हकालपट्टी केलेल्या सात आमदारांचा राजीनामा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

आमदारकीचा राजीनामा देऊन आम्ही औपचारिकता पूर्ण केली आहे. काल रात्री राजीनामा दिलेले सात आमदार आणि यापूर्वी राजीनामा दिलेले सहापैकी तीन आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील. शंकरसिंह वाघेला मात्र सत्तारूढ पक्षात प्रवेश करणार नाहीत.
- महेंद्रसिंह वाघेला, माजी आमदार

अहमदाबाद : राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार अहमद पटेल यांच्या विरोधात मतदान केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या काँग्रेसच्या गुजरातमधील सात आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष रमणलाल व्होरा यांनी आज दिली.

गुजरातमधील असंतुष्ट आमदारांवर कारवाई करताना काँग्रेसने 9 ऑगस्टला शंकरसिंह वाघेला आणि सात आमदारांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. 8 ऑगस्टला झालेल्या राज्यसभा निवडणुकीत या सर्वांना क्रॉस वोटिंग केले होते. शंकरसिंह वाघेला वगळता सात आमदारांनी काल रात्री माझ्या निवासस्थानी त्यांचे राजीनामे सादर केल्याचे व्होरा यांनी सांगितले. यामध्ये वाघेला यांचा मुलगा महेंद्रसिंह यांचाही समावेश आहे.

राघवजी पटेल आणि भोलाभाई गोहेल या दोन बंडखोर आमदारांनीही त्यांचे राजीनामे सादर केले. या दोघांची मते निवडणूक आयोगाने बाद ठरवली होती. राजीनामे सादर केलेल्या अन्य आमदारांमध्ये अमित चौधरी, सी. के. राऊलजी, धर्मेंद्रसिंह जडेजा आणि करमसिंह पटेल यांचा समावेश आहे.

देश

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले...

01.45 PM

श्रीनगर : भारत पाकिस्तान दरम्यानच्या सीमेलगत अमृतसरनजीक अंजाला सेक्टर येथे घुसखोरीचा डाव सीमा सुरक्षा बलाने (BSF) उधळून लावला....

12.06 PM

पटेल, क्षत्रिय अन्‌ आदिवासी नेतृत्वाचे आव्हान नवी दिल्ली/ अहमदाबाद, ता. 19(यूएनआय) : विकासाच्या कथित राजमार्गावरून "बुलेट'...

07.06 AM