शताब्दी कार्यक्रमास मोदींची उपस्थिती

महेश शहा
गुरुवार, 29 जून 2017

साबरमती आश्रमास मिळणार मोठे पॅकेज

अहमदाबाद: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ऐतिहासिक साबरमती आश्रमाच्या शताब्दीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना उद्यापासून प्रारंभ होत असून, या कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित विशेष दस्तावेजांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात येईल. महात्मा गांधी यांचा दक्षिण आफ्रिका ते साबरमतीपर्यंतचा प्रवास या प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे.

संपूर्ण गांधी आश्रमाच्या परिसराचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारकडून 287 कोटी रुपयांची योजना जाहीर केली जाणार असून गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही मोदी यांनी या निधीची मागणी केली होती. आश्रमाचा पुनर्विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये 40 कोटी रुपये दिले जाऊ शकतात. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात सरकारने ऐतिहासिक दांडी पुलाचे काम पूर्ण केले असून आश्रम परिसराच्या पुनर्विकासाचा आराखडा जुलै 2009 मध्येच पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन "यूपीए' सरकारने या आराखड्यास मंजुरी दिली नव्हती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरात सरकारने पुन्हा एकदा या प्रकल्पाचा आराखडा केंद्र सरकारकडे सादर केला होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरात सरकार साबरमती आश्रमाला "सायलेंट झोन' म्हणून जाहीर करणार आहे.