तमिळनाडूत प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास विरोध

वृत्तसंस्था
रविवार, 9 ऑक्टोबर 2016

चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शविला आहे.

चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शविला आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे 22 सप्टेंबरपासून जयललिता या रूग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान शुक्रवारी तमिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी राज्याचे मुख्य स चिव पी. रामा मोहना राव यांना बैठकीसाठी बोलाविले होते. त्यानंतर राज्यपालांनी एआयडीएमकेचे मंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्यासह अन्य काही मंत्र्यांशी चर्चा केली. एखाद्या मंत्र्याला उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र एआयडीएमके उपमुख्यमंत्री पदी एखाद्याला नेमण्याच्या किंवा प्रभारी मुख्यमंत्री नेमण्याच्या विरोधात आहे. मात्र जयललितांकडे असलेल्या विविध जबाबदाऱ्या इतर कोणाकडे तरी सोपविण्याबाबत पक्षामध्ये विचार सुरू आहे. सध्या जयललिता यांच्याकडे सार्वजनिक विभाग, आयएएस, आयएफएस, आयएफएस, सामान्य प्रशासन, जिल्हा महसूल, पोलिस, गृह मंत्रालया आदी जबाबदाऱ्या आहेत.

टॅग्स